Download App

तलाठी भरती! उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढली…

तलाठी पदभरतीसाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरु झाले होते. अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख 17 जुलै होती. महसूल विभागाच्यावतीने अर्ज भरण्यासाठी एक दिवसाने मुदत वाढवण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.

Maharashtra Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट! सर्वोच्च न्यायालयाने…

पत्रकात म्हटलं, महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज 17 जुलै अखेरचा दिवस होता. अनेक उमेदवरांना ऑनलाईन अर्ज भरायचा होता पण सकाळी 11 वाजेपासूनच वेबसाईटला अडचणी येत होत्या. काही काळासाठी वेबसाईटच बंद होती. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अजित पवारांनी बंड केले पण शरद पवारांचा धसका संपेना; त्यातूनच गाठीभेटींचे सत्र

महसूल विभागाच्या परिपत्रकानूसार आता तलाठी भरतीचा अर्ज भरण्यासाठी 18 जुलै ही अंतिम तारीख असून ही 18 जुलै रोजी रात्री 11 : 55 पर्यंत भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील भावी तलाठ्यांना दिलासा मिळणार आहे.

Ileana D’Cruz: कोण आहे इलियानाच्या होणाऱ्या बाळाचा बाप? फोटो शेअर करत केला खुलासा 

तसेच आॅनलाईन पद्धतीने विहित परिक्षेचा शुल्क भरण्यासाठी २० जुलै रात्री ११.५५ अशी वेळ देण्यात आली आहे. तलाठी पदभरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने स्पर्धा परिक्षार्थींना दिलासा मिळालायं. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरला नाही अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एक दिवस मुदत असणार आहे.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 1 हजार रुपये असून मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. दरम्यान, उमेदवारांना परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे.

Tags

follow us