Maharashtra Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट! सर्वोच्च न्यायालयाने…

Maharashtra Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट! सर्वोच्च न्यायालयाने…

Maharashtra Elections : राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आता निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागलं आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांतच निवडणुकीचं बिगुल वाजणारचं होत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुनावणी पार पडणार होती पण आता ही सुनावणी टळली आहे.

‘गदर’ स्टोरीत ट्विस्ट! सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात, चौकशीत धक्कादायक खुलासे?

दरम्यान, सुनावणीसाठी राज्य सरकारकडून 15 दिवसांचा वेळ मागितला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुनावणी सुरु आहे.

अजितदादा अन् पवार गट एकत्र येणार; संजय शिरसाट यांचा खळबजनक दावा

या निवडणुका आरक्षणाशिवाय घेऊ नये, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विरोधक आणि सत्ताधारी पक्षांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल करण्यात आले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे सरकारने वॉर्ड रचनेत आहे तशीच परिस्थिती ठेवण्याचा निर्णय ठेवला होता.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आलं. एक वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोना काळात रखडल्या होत्या. त्यामुळे अशा महानगरपालिकांवर प्रशासनाकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे या निवडणुका रखडल्या. त्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube