अजित पवारांनी बंड केले पण शरद पवारांचा धसका संपेना; त्यातूनच गाठीभेटींचे सत्र
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासोबतच्या नेते व आमदारांसह शरद पवारांची काल व आज भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी एकमेकांवर कडाडून टीका करत असताना अशा प्रकारे शरद पवारांची दोनदा भेट घेण्याचे काय कारण आहे, यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी वय झालं, कधी तरी थांबणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर छगन भुजबळ म्हणाले होते मी राष्ट्रवादीमध्ये नेता म्हणून आलो, पक्षामुळे नेता झालो नाही. तसेच सुनील तटकरे म्हणाले होते मी राष्ट्रवादीत येण्यापूर्वी राजकारणात होतो. काँग्रेसने मला उमेदवारीही दिली होती.
Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणारं ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?
5 जुलैच्या मेळाव्यात भाषणामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी मला एक पुस्तक लिहावे लागेल एवढे सांगण्यासारखे माझ्याकडे आहे, असे म्हणत एकप्रकारे शरद पवारांनाच इशारा दिला होता. हे सगळे एवढ्यावरच न थांबता शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडीही केली होती.
त्यानंतर काल व आज सलग दोन दिवस राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी शरद पवारांची भेट का घेतली यावर चर्चा रंगली आहे. शरद पवार आमचे दैवत असून आम्ही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असे अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा व आमच्या भूमिकेला समर्थन द्यावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे सांगण्यात आले आहे.
Casinos : महाराष्ट्रात कॅसिनो सुरु होणार? शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
राष्ट्रवादीतील या गोंधळामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना अशा प्रकरच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांना कोणाची बाजू घ्यावी हे कळत नाही आहे. या भेटींनंतर शरद पवारांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. शरद पवारांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शरद पवार या प्रकरणावर का शांत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. शरद पवारांच्या गटाकडून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांच्या गटावर हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना तुम्हाला काय कमी केलं असे ट्विट करत सुनावले होते. त्यानंतर काल व आज अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवारांची भेट घेतल्याने विविध चर्चांणा उधाण आले आहे.