Download App

विजयी मेळावा अन् मविआत फूट? काॅंग्रेसनंतर शरद पवारही राहणार दूर

Sharad Pawar On Theckeray Melava : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरुन राज्य

Sharad Pawar On Thackeray Melava : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका देखील विरोधकांकडून करण्यात येत होती तर पहिलीपासून विद्यार्थांवर हिंदी सक्ती नको या मागणीसाठी मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून 5 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार होता मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याने ठाकरे बंधूंकडून मोर्चा रद्द करण्यात आला आहे. तर आता 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

विजयी मेळाव्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत ठाकरे बंधूंकडून काँग्रेसला (Congress) या मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे शरदचंद्र पक्षाचे प्रमुख (NCPSP) शरद पवार (Sharad Pawar) देखील या मेळाव्यात जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शरद पवार कोणत्या कारणाने या मेळाव्याला जाणार नाही याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर अद्याप देखील जीआर रद्द झालेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत नरेंद्र जाधव समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणे आवश्यक आहे. 5 जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करणार आहे त्यांना आमच्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

तर या मेळाव्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. पण आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे मला काल भेटले होते. ते म्हणाले की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्या असतो असं शरद पवार म्हणाले.

मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी

तर तुम्ही या मेळाव्याला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला असता त्यांनी यावर नकारत्मक उत्तर दिल्याने महाविकास आघाडीमध्ये मराठीवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी उभी फूट पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

follow us