मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेची हाक; 5 जुलैला कलाकारांची एकजूट!

मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेची हाक; 5 जुलैला कलाकारांची एकजूट!

Ameya Khopkar Appeals Stop shooting for MNS March Marathi : ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण ठेवत सर्वांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे,” अशी भावनिक आणि ठाम हाक मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये (MNS March Marathi Language) सहभागी होण्यासाठी मराठी मालिका, चित्रपट यांचे शूटिंग 5 जुलै रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी सर्व निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांना केली आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! आभाळ फाटलं, 9 जण बेपत्ता; चारधाम यात्रा थांबवली

राज्यात सध्या हिंदी सक्तीचा (Marathi Hindi Controversy) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. शाळांमध्ये हिंदी भाषिक शिक्षकांची वाढती संख्या, स्थानिक भाषेची उपेक्षा आणि मराठी भाषिक तरुणांना नोकरीच्या संधी न मिळणे, या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मोर्चा आयोजित केला आहे. ‘मराठीचा अभिमान बाळगा’ हा नारा देत मनसेने मराठी भाषेच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेय खोपकर म्हणाले, मराठी कलाकारांनी, निर्मात्यांनी, तंत्रज्ञांनी यावेळी एकत्र येऊन मराठी भाषेच्या अस्मितेसाठी उभं राहावं. आपण सर्वजण आज ज्या उंचीवर आहोत, त्यामागे मराठी प्रेक्षकांचा आणि भाषेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

Stampede In Jagannath Rath Yatra : पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत चेंगरा-चेंगरी; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी

या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन उद्योगात शुटिंग बंद ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक कलाकार, निर्माते आणि संस्था या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. 5 जुलैचा मोर्चा केवळ एक राजकीय कार्यक्रम न राहता, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठीचा लढा ठरावा, अशी मनसेची भूमिका आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube