Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. येत्या 8 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.(The cabinet will be expanded on June 8)
Love Jihad : भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवूनही तिने धरला मुस्लिम प्रियकराचा हात…
आज राज भावनात एका टपाल तिकीट अनावरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत.
Ramdas Athawale : लोकसभेच्या तीन जागा अन् मंत्रिमंडळात स्थान हवं; आठवलेंची एनडीएकडं थेट मागणी
आज रात्री उशिरा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या बंगल्यात बैठक होणार असून याच बैठकीतून इच्छुक आमदारांना निरोप मिळणार अशल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.
NIRF Rankings 2023 : अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर युतीतील अनेक आमदारांना अद्याप कोणतीच खाती न मिळाल्याने धूसफुस सुरु होती. अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चांना उत आला होता.
येत्या 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिनही आहे. त्याअगोदरच आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे आता लवकरच युतीतील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जातंय. पण नेमकं कोणाला मंत्रिपद मिळणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.