NIRF Rankings 2023 : अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी

NIRF Rankings 2023 : अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी

NIRF Rankings 2023 : देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था (Best Engineering Institute) म्हणून आयआयटी मद्रासने (IIT Madras)अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला देशभरातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून मानांकन मिळाले आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह (Rajkumar Ranjan Singh)यांनी आज (दि.5) राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) रॅंकिंग 2023 ची यादी (NIRF Rankings 2023) जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या बाजूने विचार केला तर राज्यात यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या टॉप 10 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील फक्त एकच संस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याला आपण शिक्षणाची पंढरी म्हणत असलो तरी देखील पुण्यातील एकही संस्था या टॉप 10 संस्थांमध्ये दिसत नाही, अर्थातच यामध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी दिसून येत आहे.

भुजबळांनी सांगितला अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला; म्हणाले प्रत्येक…

देशातील टॉप 10 अभियांत्रिकी संस्था :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर
भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली
जादावपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता

त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु हे विद्यापीठ सर्वोच्च विद्यापीठांच्या यादीत अव्वल आहे.
– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु
– जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी नवी दिल्ली
– जामिया मालिया इस्लामिया, दिल्ली
– जादवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता
– बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वारानसी
– मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन मनिपाल, मनिपाल
– अम्रिता विश्वा विश्वविद्यापीठ, कोईम्बतूर
– वेल्लोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोरे
– अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड
– युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, हैदराबाद

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube