Ramdas Athawale : लोकसभेच्या तीन जागा अन् मंत्रिमंडळात स्थान हवं; आठवलेंची एनडीएकडं थेट मागणी

Ramdas Athawale : लोकसभेच्या तीन जागा अन् मंत्रिमंडळात स्थान हवं; आठवलेंची एनडीएकडं थेट मागणी

Ramdas Athawale : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)आरपीआय आठवले गटाला तीन जागा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) 10 ते 15 जागा मिळण्यासाठी आरपीआयचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांशी (Amit Shah) बोलणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आपल्याला एक मंत्रिपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचेही आठवले यांनी सांगितले. नागपूरमधील रवीभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

Pawar Vs Tumane : तुमानेंच्या आरोपांवर अजितदादांचा चढला पारा; थेट खासदारकीला दिलं आव्हान!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आमची भूमिका अशी आहे की, रिपब्लिकन पक्षाला आगामी लोकसभेसाठी दोन-तीन जागा मिळाल्या आणि त्या जर निवडून आल्या तर आमच्या पक्षाला राज्याची मान्यता मिळेल. नागालॅंडमध्ये दोन आमदार आमचे निवडून आले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला राज्याची मान्यता मिळाली आहे.

बदल्यांचे रेटकार्ड ते पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप, अजित पवारांनी सगळचं काढलं

महाराष्ट्रामध्ये आरपीआयला जर स्वतःच्या पक्षाचं चिन्ह आणि इलेक्शन कमिशनची मान्यता मिळवायची असेल तर दोन जागातरी आमच्या जागा निवडून आल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आरपीआयला दोन ते तीन जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर विधानसभेलाही आम्हाला दहा ते पंधरा जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभेसाठी कोणत्या जागा घ्यायच्या हे आम्ही बसून ठरवणार आहोत, असंही ते म्हणाले. आमच्याकडील उमेदवार पाहून या जागा ठरवणार आहोत. त्याचबरोबर विदर्भामध्ये एखादी जागा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. शिर्डीची जागा आपण एकदा हरलो होतो, त्यानंतर आता आपली राज्यसभा 2026 पर्यंत आहे. त्यामुळे लोकसभा लढलीच पाहिजे असं नाही. जर संधी मिळाली तर आपण निवडणूक लढवू असंही यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube