Class 12th Board Results Today : इयत्ता १२ वी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर दुपारी एक वाजता होणार असला तरी तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. (Results) त्यामध्ये परिक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची आकडेवारी सांगण्यात आली आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
14 लाखस २७ हजार 85 विद्यार्थ्यांनी परिक्षेला अर्ज केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यामधून 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे.
खासगी विद्यार्थ्यांची एकून संख्या 36 हजार 136 इतकी होती. त्यामध्ये 35 हजार 697 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यामधून 29 हजार 892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73 टक्के इतकी आहे. त्याचबरोबर सर्व शाखांमधून एकून 42 हजार 388 विद्यार्थ्यांनी नोंदनी केली होती. त्यापैकी 42 हजार 24 विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसले होते. त्यामधून 15 हजार 8 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 टक्के इतकी आहे.
HSC result 2025: बारावीचा निकाल, विभागनिहाय निकालात कोण आघाडीवर? वाचा एका क्लिकवर
बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.
या संकेतस्थळावर निकाल
1) https://results.digilocker.gov.in
यावर्षी १२ वीचा निकाल
१.४९ टक्क्यांनी झाली घट
२०२२ ला ९४.२२ टक्के निकाल
२०२३ ला ९१.२५ टक्के निकाल
२०२४ ला ९३.३७ टक्के निकाल
२०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल
गेल्यावर्षीचा निकाल
विभागनिहाय निकाल पाहा
कोकण : 97.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के