Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. (Bahin ) अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल.
लाडकी बहीण योजना बंद होणार? त्या चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!
या योजनेचा आठवा हफ्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिले होते. त्याप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे. त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे २१ ते २९ फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला जात आहे. तसेच पुढील ८ दिवसांत हा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. ३ मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याने त्याआधी हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे. या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात. आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागेल.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. निवडणूका होऊन तीन महिने झालेत तरीही महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा झाले नाहीत. आता हे पैसे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ देण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.