आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगकडे गेल्यानंतर आयोगाने दोन्ही गटाला नोटीस पाठवली. या प्रकरणावर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली…
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, आम्ही एनडीए आणि राज्यात महायुतीमध्ये सहभागी होण्याची जी भूमिका घेतली आहे. त्या निर्णयावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल, त्यामुळे आता अजित पवार गटाचीच भूमिका योग्य असल्याचा निर्वाळा देणार असल्याचं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. तसेच २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याचा सामुहिक निर्णय पक्षाच्या वरीष्ठ मंडळींनी एकत्र बसून घेतला. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय आणि निवडणूक आयोगाने अलीकडच्या काळात दिलेला निर्णय याची कायदेशीर, वैधानिक पूर्णपणे खात्री करून हा निर्णय घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
Maratha Reservation फडणवीसांची क्षमायाचना म्हणजे एकप्रकारची कबुलीच – शरद पवार
यावेळी बोलताना तटकरे यांनी इतर मुद्द्यावरही भाष्य केले आहे. तटकरे म्हणाले, ओबीसींना आरक्षण राखून ठेवूनच त्यांचा जो हक्क आहे तो राखून ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे असे आमचे मत आहे आणि हीच मतप्रणाली सरकारच्या पुढे आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
भारत हा माझा देश आहे असे शिकतच लहानपण सर्वांचे गेले. भारतीय शब्दावरून जे आज वेगवेगळे विचार मांडले जात आहेत. प्रत्येक नागरिकाला आजपर्यंत आपण देशाबद्दल संबोधित करत आलो.’ इंडिया’ हे नाव कदाचित यापूर्वीच्या ब्रिटिशांच्या कालावधीत किंवा इंग्रजी व्हर्जन असू शकेल. हिंदीमध्ये ‘भारतमाता की जय’ आणि मराठीतही बोलतो. त्यामुळे यावर टिका करण्यापेक्षा हा विचार, हे स्वागतार्ह आहे ही भूमिका सर्वांनी घेतली तर निश्चितच योग्य राहणार असल्याचं सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.