Jayant Patil : शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातली आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत जात वेगळा गट तयार केला. शिंदे यांनी फडणवीसांसोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र आता न्यायालयात सुरु असलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेबाबत कोर्ट काय निकाल देणार यावर आगामी राजकारण बदलू शकते. तसेच ते 16 आमदार जर अपात्र ठरले तर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते असा अंदाज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल 15 मे पूर्वी लागू शकतो असा अंडे व्यक्त केला जातो आहे. एकीकडे निकाल काय लागतो यामुळे शिंदे गटात अस्वस्था आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून देखील सध्या आगामी परिस्थिती पाहता राजकीय हालचाली सुरु केल्या आहे.
‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला
शिवसेनेच्या 16 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे यामुळे त्यांची भीती वाढली आहे.सत्तासंघर्षाचा निकालावार पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी याच मुद्द्यावर एक महत्वाचे विधान केले आहे.
राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला
सुप्रीम कोर्टात सध्या शिंदे गटातील 16 आमदारांबाबत सुनावणी सुरु आहे. या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार सध्या आहे. यातच हे आमदार जर अपात्र ठरले गेले तर ते पुन्हा एकदा ठाकरे गटात येतील. यामुळे पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र निकाल काय लागणार यावर आगामी राज्यातील सत्तेची गणित अवलंबून असल्याचे देखील ते म्हणाले आहे.
भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पावसाचा अंदाज