Download App

महाराष्ट्राच्या राजकारणाला अन् प्रशासनाला हादरवणारी बातमी; अनेक मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये

नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची थेट चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमध्ये घडल्याचंही बोललं जातय.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Political Leaders In Honeytrap : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय (Honeytrap) वर्तुळात खळबळजनक उडवून देणारी बातमी समोर आली आहे.  नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. हे प्रकरणं फक्त हनी ट्रॅपची आहेत का? अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, हे समोर येणं बाकी आहे. मात्र यामुळं वातावरण मोठं गरम झालं आहे.

नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची थेट चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये घडल्याचंही बोललं जातय . या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यामुळे कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे अशी माहिती समोर येत आहे.

कल्याणीनगर अपघातातील तो कारचालक अल्पवयीनच; न्यायालयाने फौजदारी खटल्याचा अर्ज फेटाळा

हे प्रकरण गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणामुळे नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे या हनी ट्रपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागं काही मोठं षडयंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे. संबंधित व्हिडीओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होण्याचीही चर्चा आहे. मात्र, या गौप्यस्फोटामुळे नाशिकपासून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असं बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणाचे सत्य कधी समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

follow us

संबंधित बातम्या