Devendra Fadanvis Bomb Threat Call : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोननं एकच खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस नियंत्रण कक्षाला फडणवीसांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रवाना झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
दरम्यान, चौकशी केली असता धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या घरची लाईट गेली होती. म्हणून त्याने रागाच्या भरात अशाप्रकार धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नागपूरमधील कान्हन परिसरातून हा फोन आल्याचे सांगितले जात आहे.
काल रात्री पोलिसांना फडणवीसांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. रात्री दोनच्या सुमारास या व्यक्तीने पोलिसांना फोन केला होता. यानंतर पोलिस आपल्या टीमसह व बॉम्ब शोधक पथकाला घेऊन फडणवीसांच्या घरी दाखल झाले. यानंतर असा कोणताही बॉम्ब नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
परंतु या घटनेनंतर पोलिसांनी फडणवीसांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच ज्या व्यक्तीने हा फोन केला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या घरची लाईट गेली होती. म्हणून त्याने रागाच्या भरात अशाप्रकार धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.