‘एक्सप्रेस वे’ वरील प्रवास महागला; टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ, असे असणार दर

  • Written By: Published:
‘एक्सप्रेस वे’ वरील प्रवास महागला; टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ, असे असणार दर

Mumbai Pune Express Way Toll News :  पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. मात्र, येत्या 1 एप्रिलपासून या मार्गावरील प्रवास महागणार आहेत. कारण, एक्सप्रेस वे वरील टोलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून या ठिकाणी नव्या दराने टोल घेतला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास महागणार आहे. यापूर्वी 1 एप्रिल 2020 मध्ये टोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता येत्या 1 एप्रिल 2023 पासून पुन्हा दरवाढ केली जाणार आहे. याबाबत एमएसआरडीसीकडून माहिती देण्यात आली आहे.

2004 मध्ये ज्यावेळी हा टोल सुरू करण्यात आला त्यावेळी यामध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून या मर्गावरील टोल दरात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास महागणार असून, वाढणाऱ्या टोलमुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी

असे असणार दर
चार चाकी वाहन – सध्याचे दर 270 एप्रिल 2023 पासून नवीन दर 320, टेम्पो – सध्याचे दर 430 एप्रिल 2023 पासून नवीन दर 495, ट्रक – सध्याचे दर 580 एप्रिल 2023 पासून नवीन दर 685, बस- सध्याचे दर-797 एप्रिल 2023 पासून नवीन दर 940, थ्री एक्सल वाहन- सध्याचे दर-1380 एप्रिल 2023 पासून नवीन दर 1630, एम एक्सल वाहन – सध्याचे दर-1835 एप्रिल 2023 पासून वाहन चालकांना 2165 रुपये भरावे लागणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एवढेच नव्हे तर, पावसाळ्यात अनेकदा येथे दरडी कोसळून अपघाताच्या घटनाही घडतात. त्यात सुधारणा करण्याऐवजी टोलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकामध्ये नाराजीचा सूर आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube