Download App

मोठी बातमी : लाडक्या बहि‍णींना CM शिंदेंचा आणखी एक गिफ्ट : अशक्त तिजोरीवर चार हजार कोटींचा भार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या बरीच चर्चेत आहे. या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना सरकार दरमहा दीड हजार रुपयांची मदत देणार आहे. आता याच योजनेतील महिलांसाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पातून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा किमान दोन कोटी महिलांना होण्याचा अंदाज आहे. लवकरच या योजनेचा शासन निर्णयही निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. (Three gas cylinders will also be given free per year to the beneficiaries of the ‘Chief Minister Majhi Ladki Bahini’ scheme)

Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार

राज्यात आजमितीस तीन कोटी 49 लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहे. यातील उज्ज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या 300 रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी वार्षिक 830 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देतांना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

काय आहेत अटी :

एका कटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिला जाणार आहे. त्यातही गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळणार आहे. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना मिळण्याचा अंदाज असला तरीही मोफत गॅस सिलिंडरचा लाभ साधारणत: दीड कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे त्यामुळे सरकारवर वार्षिक चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे.

 

follow us