Devendra Fadnavis on Budget 2025 : आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. (Budget ) यानंतर आता सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मध्यम वर्गासाठी एक स्वप्नवत असा अर्थसंकल्प मांडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. सात लाखांची असलेली मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता १२ लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय, नोकरदार आणि तरुणांना होणार आहे. यामुळे मोठं उत्पन्न मध्यमवर्गींच्या खिशात येणार आहे. हे उत्पन्न खर्च करताना देशातील मागणी वाढेल. ज्याचा थेट फायदा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उत्पादनांना होईल असं फडणवीस म्हणाले आहेत.
Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय महाग, काय स्वस्त;संपूर्ण यादीच समोर
विशेषत: शेती क्षेत्रामध्ये १०० जिल्हे आयडेटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल. पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की, तेलबियांच्या संदर्भात जी काही मुल्य साखळी तयार होईल, त्याच्यामध्ये १०० टक्के खरेदी केंद्र सरकार हमी भावाने करणार आहे. याचा शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि पैसे मिळण्याकरता फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांसाठी क्रेडिट लिमिट तीन लाख होती ती पाच लाख बिनव्याजी केली करण्याता आली आहे. शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने केल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन पाई लाईन तयार करण्यात आली आहे. पीपीपी प्रकल्पांकरता नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे खासगी क्षेत्राची गुतंवणूक वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल. ज्या अॅसेटमध्ये गुंतवणूक केली आहे तो पैसा रियलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला चालना मिळणार आहे. युवांकरता वेगवेगळे मिशन आहेत ते महत्त्वाचं असून त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारे आहेत. २१ व्या शतकातील हा विकसित भारताचा अर्थसंकल्प असून भारत आता सर्व समावेशक अर्थव्यवस्थेकडे चालला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
LIVE | Interaction with media on #ViksitBharatBudget2025
🕐 12.57pm | 1-2-2025 📍 Mumbai.#Maharashtra #Mumbai #ViksitBharatBudget25 https://t.co/2HCkh1mHZW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2025