मोठी बातमी! हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन चाललेला ट्रक चिखली घाट परिसरात पलटी

Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साइड केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने चिखली घाट परिसरात

Nagar Daund Highway

Nagar Daund Highway

Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साइड (Hydrogen Peroxide) केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने चिखली घाट (Chikhali Ghat) परिसरात पलटी झाल्याची घटना मंगळवार घडली. ट्रक पलटी झाल्याने टँकरमधील केमिकल गळती सुरू होऊन परिसरात धुराचे वातावरण तयार झाले होते.

माहितीनुसार, ट्र्क ओसवाल कंपनीची असून हार्मोनी केमिकल कंपनीकडे जात होती. सन फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर त्यांनी बचावकार्य केले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

संभाजीनगरमध्ये नाही, आता शिर्डीत होणार राष्ट्रवादीचे नवसंकल्प शिबीर, ‘हे’ आहे कारण

Exit mobile version