RanajgajitSingh Patil Exclusive : सुरवातीचे काही काळ आम्ही विरोधात होतो. त्यामुळे अनेक प्रकल्प आणता आले नाहीत. परंतु, सुरूवातीचे ठाकरे सरकार सोडलं तर महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात कामाला मंजूरी दिली. (RanajgajitSingh Patil) त्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. तर काही प्रकल्प बाकी आहेत ते लवकरच मार्गी लावण्याचं काम आम्ही करणार आहोत अशी माहिती तुळजापुरचे भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते लेट्सअस मराठीवर लेट्सअप चर्चा या विशेष भागात बोलत होते.
मी राजकारणात अपघाताने आलो. माझ इंजिनिअरींगचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर मी विदेशातही गेलो. त्यानंतर माझं एक युनिट मी मुंबईत चालू केलं होत. परंतु, ते काही नियतीला मान्य नव्हत. मी पुढे राजकारणात आलो असंही राणा पाटील यावेळी बोलताना म्हणाले. तसंच, तुम्ही इंजिनिअर आहात तर राजकारणात शिक्षणाचं महत्व सांगा. त्यावर बोलताना, राणा पाटील म्हणाले इंजिनिअर हा एक कायम प्रागतिक विचार करणारा असतो. त्या विचारांचा राजकारणात नक्की फायदा होतो असंही राणा पाटील यावेळी म्हणाले. तसंच, फक्त भावनिक होऊन काम चालत नाहीत असा टोलाही त्यांनी नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांना लगावला आहे.
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला
यावेळी त्यांनी कृष्णा खोऱ्यातील पाण्याची स्टोरीही सांगितली. त्यावर ते म्हणाले, 1999 ते 2000 चा हा विषय आहे. पद्मसिंह पाटलांनी हा विषय हातात घेतला होता. त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पद्मसिंह पाटलांनी मंत्रीमंडळात आक्रमकपणे विषय मांडला. तसंच, हा विषय मार्गी लागला नाही तर ही बैठकच संपणार नाही अशी भूमिकाही पद्मसिंह पाटलांनी घेतल्याचं राणा पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसंच, आम्ही मोठा संघर्ष करून हा प्रश्न सोडवल्याचंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी तुम्ही गुगलवर पीक विमा तज्ञ असं दाखवतात. त्यावर बोलताना राणा पाटील म्हणाले, हा विषय क्लिष्ट असल्याने लोक यामध्ये रस घेत नाहीत. परंतु, मी इंजिनिअर असल्याने मला यामध्ये रुची आहे. तसंच, हा पीक विमा मिळवण्यापासून अनेक शेतकरी काही ठिकाणी तर अनेक जिल्हेच वंचित राहिले होते त्यामुळे तो प्रश्न मी मनावर घेतला. शेवटी तो पीक विमा कंपनीला नाही तर पहिल्यांदा सरकारला द्यावा लागला असंही राणा पाटील यांनी यावेली सांगितलं.
यावेळी राणा पाटील यांनी नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही भाष्य केलं आहे. विरोधक टीका करतात मग तुम्ही कसा पलटवार करता असं विचारलं असता, राणा पाटील म्हणाले, काही लोक बाळ म्हटलं तरी उत्तेजित होतात. काय कारण यांना उत्तेजित होण्याचं. कारण जो माझ्यापेक्षा लहान त्याला मी बाळ म्हटलं तर काय फरक पडतो. परंतु, काह लोकांचे संस्कार वेगळे आहेत, आमचे संस्कार वेगळे आहेत असं म्हणत राणा पाटील यांनी बाळ विषयावरून झालेल्या वादावर पु्हा एकदा भाष्य केलं आहे.