मुंबईतील गणेशोत्सवात अडचणी निर्माण होतील, असे कृत्य करू नका; उदय सामंतांचे जरांगेंना आवाहन!

Uday Samant on Manoj Jarange ज्यांनी मराठा समाजाला कधीही न्याय दिला नाही, त्यांचे कौतुक केले जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

Uday Samant on Manoj Jarange

Uday Samant on Manoj Jarange

Uday Samant on Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबतची जरांगेंची चर्चा फिस्कटली आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी या संदर्भात जरांगे यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठीचे सर्व पर्याय संपले आहेत, असे म्हटले आहे. त्यानंतर मनोज जरांगेंनी विखेंवर टिकास्त्र सोडले आणि 12 सप्टेंबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाजाला अंतरवालीत बोलवाले आहे. त्यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जरांगे एक यांना आवाहन केले.

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक; बंदुकधारी बॉडीगार्डसह 24 वर्षीय तरुण ताब्यात

मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी मराठा समाजाला कधीही न्याय दिला नाही, त्यांचे कौतुक केले जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; विखे पाटलांना जरांगेंचा थेट इशारा

सरकारने जरांगे यांच्या 15 मागण्यांपैकी 12 मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित तीन मागण्यांवरही लवकरच तोडगा काढला जाईल, असा दावा उदय सामंत यांनी केला. त्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवरही सामंत यांनी जरांगे यांना आवाहन केले. गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण असून मुंबईत तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाकडे जगभरातील लोकांचे लक्ष असते. त्यामुळे गणेशोत्सवात अडचणी निर्माण होतील, असे कोणतेही कृत्य मनोज जरांगे पाटील यांनी करू नये, असे सामंत म्हणाले.

आजपर्यंत मराठा समाजाला जे दिलं, ते आम्हीच दिलं; इथून पुढेही देऊ, फडणवीसांचे आश्वासन!

एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केली आणि आरक्षण कसे दिले जाते, हे दाखवून दिले आहे. तसेच 2014 पासून देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

दहीहंडी केली तर एन्काउंटर करू; पोलिसांवर दमबाजीचा आमदार संग्राम जगतापांचा गंभीर आरोप

पण जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे 12 सप्टेंबरला जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Exit mobile version