ठाकरे बंधूंची तोफ एकाच दिवशी धडाडणार; कोकणात होणार जाहीर सभा

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राजकीय सभांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीकडून राज्यातील विविध ठिकाणी वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे महाविकास आघाडीची व्ज्रमूठ सभा पार पडली आहे. तसेच या व्यतिरिक्त ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जात आहे. खेड व मालेगाव येथे दोन ठिकाणी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T170223.193

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 20T170223.193

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राजकीय सभांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीकडून राज्यातील विविध ठिकाणी वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे महाविकास आघाडीची व्ज्रमूठ सभा पार पडली आहे. तसेच या व्यतिरिक्त ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जात आहे. खेड व मालेगाव येथे दोन ठिकाणी त्यांची सभा झाली आहे. त्यामुळे  राज्यात सभांचा धडाका उडतो आहे.

त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात सभा होणार आहे. याअगोदर त्यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात कोकणात सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांची सभेची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार 6 मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होणार आहे. त्यामुळे यावेळी त्यांची तोफ कुणावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राजक्ता माळीचा हटके फोटोशूट, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, पाहा फोटो

यानंतर आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील याच दिवशी महाडला सभा होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची तोफ एकाच दिवशी धडाडणार असलल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे भाजप व शिंदेगटासह राज ठाकरेंवर देखील बोलण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं गुडघ्याला बाशिंग…

याअगोदर राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना पक्ष चिन्ह व नाव जाण्यावरुन देखील त्यांनी भाष्य केले होते. त्यामुळे या सभेत पुन्हा ते उद्धव ठाकरेंवर बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरेंची सभा होते आहे का, असेही याकडे पाहिले जात आहे.

Exit mobile version