Radhakrishna Vikhe on Uddhav Thackeray : भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला शोभा देणारे नाही. (Vikhe) ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. शदर पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेचं आलेलं वक्तव्य म्हणजे दंगली घडवण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
एका रात्रीच होत्याचं नव्हत झालं; वायनाडमध्ये मृतांचा आकडा 254, तर 300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज
राजकारणात मतभेद असू शकतात. पण, भावनेच्या भरात आपण काय बोलतो याचं भानही उध्दव ठाकरे यांना राहू नये याचं आश्चर्य वाटतं. राज्यात मणिपूरचा संदर्भ देवून जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि आता उध्दव ठाकरे यांची भाषा राज्यात दंगली घडविण्यासाठी आहेत का? असा सवालही विखे यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यातील सर्व जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून,आता राज्यात महायुतीला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता महाविकास आघाडीला यश मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच आशी वक्तव्य पुढे येवू लागली असल्याचंही विखे पाटील म्हणाले. तसंच, महाविकास आघाडी नाही तर महायुतीलाच यश मिळेल असंही विखे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुध्दा आघाडीच्या तीनही पक्षाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही. काल उध्दव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवून मोकळे झाले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय केलं हे एकदा तरी सांगावं अस थेट आव्हान देवून नामांतराच्या संदर्भात झालेली चूक जशी पवारांनी मान्य केली तशीच चूक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मान्य करावी आशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात उध्दव ठाकरेंनी
केलेलं वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. -राधाकृष्ण विखे पाटील.#vikhepatil #UdhhavThackeray pic.twitter.com/v60SeExZwz— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 1, 2024