रत्नागिरी : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेतली. सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेत 2019 सालीच गद्दारी झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली. सत्तेसाठी ठाकरेंनी भूमिका बदलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. अनेकदा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केली. आता मात्र, जो आपला पक्ष सांभाळू शकत नाही, त्यांच्यासाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
Chandrkant Patil : शिवसेनेच्या वाट्याला किती जागा? आत्तापासून ठरविण्याचं कारण नाही
मुख्यमंत्रिपदासाठी विचारांशी गद्दारी केलीत. काँग्रेसकडून पक्ष सोडवण्याचं काम आम्ही केलं आहे. बाळासाहेब तुमचे वडिल आहेत पण आमचे बाळासाहेब दैवत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तुम्ही आघाडी करुन तर बाळासाहेबांनाच चुकीचं ठरवलं असल्याचा टोला लगावला आहे.
तुम्ही लावलेले डाग आम्ही पुसण्याचं काम केलं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं आहे. मोदींनी कलम 370 हटवलं नसतं तर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू शकले असते का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांच्या नावे खोटी सहानूभूती मिळवू नका, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
Radhakrishna Vikhe: हजार रुपयात घरपोच वाळू; महसूलमंत्री विखेंची मोठी घोषणा
आज सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचा नातू आणि मुलगा काँग्रेससाठी मत मागत आहे. हे राज्याचं दुर्देवं आहे. जो मुलगा आपला पक्ष सांभाळू शकत नाही त्यांच्यासाठी तुम्ही कशी मतं मागताहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
जे तुमच्या गळ्यात गळे घालताहेत उद्या तेच तुमचे गळे कापणार असल्याचं भाकीतही मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे. तसेच आम्ही शिवसेनेच्या संपत्तीवर आम्ही कोणत्याही स्वरुपाचा दावा करणार नसून हा एकनाथ शिंदे गद्दार नसून खुद्दार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.