Uddhav Thackeray press conference : उद्याचा महाराष्ट्र बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये. (Uddhav Thackeray) उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या बंदसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव अस आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचा कार्यकर्ता असेल तरी कारवाई झाली पाहिजे; बदलापूर अत्याचार घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये यासाठी आपण महाराष्ट्र बंदच्या माध्यमातून एकत्र येणार आहोत. उद्या लोकल आणि बस बंद ठेवल्या पाहिजेत. याबाबत मला संताप आलेला असला तरी मी विरोधकांना विनंती करतो. कुठही पोलिसांचा गैरवापर करू नका. हा बंद मोडून काढण्यासाठी प्रयत्न करू नका. तसंच, हा बंद राजकीय नसून सर्वांना यामध्ये सामील होऊ शकतो.
Badlapur : गुन्हा लपवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न; बदलापूर घटनेवरुन राहुल गांधींचे टीकास्त्र
सध्या पोलीस महासंचालिसा महाराष्ट्राच्या इतिहासात त्या पहिल्यांदा त्या पदावर महिला आहेत. त्यांना महाराष्ट्राची लाडकी बहीण होऊ शकतात. त्यांनी सर्व पोलिसांना आदेश द्यायला हवेत की बंदला सहकार्य करा. त्याला मोडीत काढू नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच, मुख्यमंत्री राखी बांधण्याच्या कार्यक्रमाला जाऊ शकातात. त्यांच्यामते बहीणी फक्त मत देण्यासाठी आहेत. आमच्यासाठी त्या मत नाही तर नात ही आमच्यासाठी बहिणींची किंमत आहे असंही उद्वव ठाकरे म्हणाले आहेत.