Download App

शिवसेनेच्या कोट्यातील आठ जागा भाजपला अन् चार राष्ट्रवादीला? ’32’ मतदारसंघात ‘कमळाचे’ उमेदवार

मुंबई : भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातील पारंपारिक आठ जागा भाजपच्या आणि चार जागा राष्ट्रवादीच्या (NCP) वाट्याला आणि भाजपच्या (BJP) कोट्यातील एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानुसार भाजप 32, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी पाच अशा जागा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. यातील काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार कमळ चिन्हावर उभे राहणार असल्याचीही माहितीत आहे. (upcoming Lok Sabha elections BJP will contest 32 seats, Shiv Sena 11 and NCP five.)

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी, शिरुर, सातारा, रायगड या शिवसेनेच्या कोट्यातील चार आणि बारामती ही भाजपच्या कोट्यातील एक अशा पाच जागा राष्ट्रवादीला देण्याची तयारी भाजपने केली आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातील मुंबई दक्षिण, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पालघर, हिंगोली, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या आठ जागांवर भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा ‘खो’; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’

भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येत होत्या. मात्र भाजप 32 जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.

मोठी बातमी : माझे वडील सर्वस्व…!; लोकसभेच्या रणधुमाळीतून छत्रपती संभाजीराजेंची माघार

दिल्लीत उमटणार अंतिम मोहोर :

जागा वाटपाच्या या प्रस्तावावर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष अंतिम मोहोर उमटणार असून यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपच्या सहा नेत्यांना घेऊन दिल्लीला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना  अमित शाह दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.

follow us