मोठी बातमी : माझे वडील सर्वस्व…!; लोकसभेच्या रणधुमाळीतून छत्रपती संभाजीराजेंची माघार

  • Written By: Published:
मोठी बातमी : माझे वडील सर्वस्व…!; लोकसभेच्या रणधुमाळीतून छत्रपती संभाजीराजेंची माघार

कोल्हापूर : आगामी लोकसभेसाठी राज्यातील विविध पक्षांच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नसतानाच कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेच्या रणधुमाळीतून माघार घेतली आहे. माझे वडील सर्वस्व असल्याचे म्हणत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लढवण्याचे ठरवले आहे. मी त्यांच्यासोबत असून माझा लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपला त्यांना पाठिंबा असून, आमचं लक्ष फक्त कोल्हापूरवर असल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. शाहू महाराजांचा अनुभव कोल्हापुरला दिशा दाखवणारा असून, मविआच्या निर्णयावर महाराज त्यांची भूमिका सांगतील आणि ती भूमिका आपल्या मान्य असेल असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या कोट्यातील आठ जागा भाजपला अन् चार राष्ट्रवादीला? ’32’ मतदारसंघात ‘कमळाचे’ उमेदवार

काय घडले होते 2009 मध्ये?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. उदयसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथून तब्बल पाचवेळा विजय साकारला. 1999 नंतर सदाशिवराव मंडलिकांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे सरकला. पण 2009 मध्ये “आता बैल म्हातारा झाला आहे, नवीन खोंड निवडा.” असं म्हणत शरद पवार यांनी मंडलिकांना डावलून संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली.

पंकजांच्या नेतृत्त्वाला शाहांचा कौल; वन टू वन चर्चेमुळे बीडमधील समीकरणं बदलणार

त्यावेळी युती धर्माचे पालन करत काँग्रेसचे तत्कालिन नेते सतेज पाटील यांनी संभाजीराजे आणि राष्ट्रवादीचे काम केले. मात्र सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादीतील काहींनी मंडलिकांना छुपी मदत केली होती, असा आरोप झाला. पण त्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाले. 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube