Download App

…वरना वक्त के पहले फकिर, गुलाबराव पाटलांची खास शैलीत टीकेची झोड

जळगाव : जो आम्हाला आडवा येईल, त्याचा सत्यानाश होणार असल्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला आहे. ते जळगावमधील पारोल्यात विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय.

कार्यक्रमादरम्यान, गुलाबराव पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातील शेरेबाजी करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं. “जमीर बेचनेवालो से हमने दोस्ती नहीं की, वरना वक्त के पेहलो अमिर हो जाते…हम एक साथ दो नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकिर हो जाते” या शब्दांत त्यांनी टीका केलीय. तसेच बोक्यांनो आम्ही खोक्यावालेच, मतदारसंघात मी 385 कोटींची विकासकामे केली आहेत. गेल्या 35 वर्षांपासून काम करीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

kasbah Bypoll Election : नाकात नळी, थरथरते हात: गिरीश बापटांचा कार्यकर्त्यांना संदेश

शंभर दिवस हिजड्यासारखं जगल्यासारखं लोकं आम्ही नाही एक दिवस वाघासारखे जगणारे आम्ही माणसं आहोत, ही बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिल्याचं सांगितलंय. तसेच आमचा उठाव हा केवळ भगव्यासाठी होता. माझ्या मतदारंघातला पूल 75 वर्षांत कोणालाच दिसला नाही, फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिसल्याचं त्यांनी सांगितलंय.

धर्मगुरुकडून 4 हजार मुलांचं लैंगिक शोषण…

पाणी पुरवठा योजनेची कामे मी केलीत. आता 38 हजार लोकांना पाणी मिळणार आहे. आम्ही पाणी योजना देतोय, हे लोकं काही आमचं पिणार नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पाणी पिला पिला के मारेंगे, या शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

दरम्यान, भूकणाऱ्यांची चिंता करायची नसते ‘हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार’ आपण आपलं काम करत राहायचं, असंही ते म्हणालेत. भाषणाच्या अखेरीस त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Tags

follow us