Download App

मनोज जरांगे हा पवारांनी उभा केलेला माणूस…; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

जरांगेंनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला नाही, तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल- आंबेडकर

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच भेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी अद्याप मान्य न झाल्याने जरागेंनी विधासभेला निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत दिले. त्यांनी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याचेही आदेश दिले. दरम्यान, आता जरांगेंच्या भूमिकेवरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जरांगेंवर टीका केली.

परमबीर सिंह यांचं अनिल देशमुखांना खुलं आव्हान, म्हणाले, ‘नार्को टेस्ट करु..,’ 

प्रकाश आंबेडकरांची सध्या राज्यात आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. आज दर्यापूरमध्ये झालेल्या सभेत आंबेडकरांनी जरांगेंसह राज्यातील राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस आहे, असं बोलल्या जातं. आता तर त्यांनी विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहे. मात्र, संकेत देऊनही त्यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला नाही, तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल, असं आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि राजकीय नेते मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत. पण, ओबीसींचं आरक्षण वाचवायला कोणी तयार नाही, म्हणून आम्ही यासाठी पुढाकार घेतला. मी ही यात्रा काढ़ली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय पक्ष पळवाटा काढत आहेत. हे राजकीय पक्ष ओबीसींबाबत कोणतीही भूमिका घेणार नाहीत.

Sonu Sood: अभिनेत्याचा Abs दाखवतानाचा फोटो इंटरनेटवर झाला व्हायरल, चाहते झाले थक्क! 

जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, ही भमिका घेतली. उद्धव ठाकरेंनी मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या, वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, असं सांगितलं. मात्र, इथल्या कोणत्याही पक्षाने ओबीसी आरक्षणावर भूमिका घेतली नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे, ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. गरीब मराठ्यांना वाटतं की, आरक्षण मिळालं तर आपण सक्षम होऊ… त्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. मात्र, गरीब आणि श्रीमंत मराठ्यांमधील संघर्षात ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.

ओबीसी आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुक पार पडल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरू नका. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणा, असे आवाहनही आंबेडकरांनी केलं.

follow us