Download App

महाराष्ट्राची मान खाली! मागील 10 महिन्यांत 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

  • Written By: Last Updated:

Farmers Suicide : कधी नापिकी तर कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीठ तर कधी महापूर तर कधी शेतीमालाला योग्य भावच नाही, या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. शेतकरी आत्महत्येचं हे सत्र थांबता थांबेना. राज्यात गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्रात 2478 शेतकऱ्यांनी मृत्यूला (2478 Farmer suicide) कवटाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात (Winter Session) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.

विधानसभेत भाजप आमदारानं गुणगुणलं रफींचं गाणं; दाद देत फडणवीसांनी दिली ग्वाही 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी सतत नवनवीन आव्हानांना तोंड देत आहेत. पूर, नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव नसणे अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. राज्य सरकारने विधिमंडळात शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. सततचा नापीकपणा, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेतमालाला भाव नसणे ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत.

CM Shinde : जुनी पेन्शन योजनेबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेणार; CM शिंदेंची मोठी घोषणा 

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अमरावती विभागात 951, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात 877, नाशिक विभागात 254, नागपूर विभागात 257, पुणे विभागात 27, लातूर जिल्ह्यात 64, धुळ्यात 28 आत्महत्या नोंदवल्या आहेत. ही माहिती राज्य सरकारने लेखी उत्तरात दिली आहे.

दरम्यान, भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कै वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि प्रबोधनाची आवश्यकता लक्षात घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येतात. विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी समृद्धी योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबताना दिसत नाही.

 

Tags

follow us