विधानसभेत भाजप आमदारानं गुणगुणलं रफींचं गाणं; दाद देत फडणवीसांनी दिली ग्वाही

विधानसभेत भाजप आमदारानं गुणगुणलं रफींचं गाणं; दाद देत फडणवीसांनी दिली ग्वाही

Randhir Savarkar Demands: नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अनेक विषयांवर येथे जोरदार हेवे-दावे सुरू आहेत. या सर्व तापलेल्या वातावरणात अकोला भाजपच्या आमदारांनी प्रसिद्ध पार्श्वगायक महोम्मद रफी यांच्या गाण्याचे बोल गुणगुणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे विशेष मागणी केली. विशेष म्हणजे सावरकरांनी सभागृहात गायलेल्या गाण्याला आणि मागणीला फडणवीसांनी दाद देत त्यांची मागणी पूर्ण केली जाईल अशी ग्वाही दिली.

सावरकरांची मागणी काय?

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांनी एक काळ गाजवला होता. 24 डिसेंबर 1924 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. येत्या 24 डिसेंबर रोजी रफी साहेबांच्या जन्मशताब्दीचे 100 वे वर्ष आहे. त्यांची जन्मभूमीजरी पंजाब असली तरी, त्यांच उभं आयुष्य महाराष्ट्र गेलं. त्यामुळे रफी साहेबांचं 100 वं जन्मशताब्दी वर्ष सरकारनं यथोचित पद्धतीने साजरं करावं. रफी साहेबांनी हजारो गाणी रेकॉर्ड केल्याचे सांगत त्यांनी लक्ष्मी पॅरेलाल यांचं पहिलं आणि आयुष्याच्या शेवटी म्हणजे निधन होण्यापूर्वीदेखील रफींनी लक्ष्मी-पॅरेलाल यांचं ‘चाहूँगा मै तुम्हे शाम सवेरे’ हे आजरामर गाणं रेकॉर्ड केल्याची आठवण सावरकरांनी यावेळी सांगितली. त्यामुळे सरकारनं हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करून एक मोठा कार्यक्रम घ्यावा तसेच, त्यांच्या गाण्यांची डॉक्युमेंट्री सगळीकडे प्रसिद्ध करण्याची मागणी सावरकांनी विधानसभेत केली.

सावरकरांच्या मागणीला फडणवीसांनी दिली दाद

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सावरकरांना दाद दिली. ते म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की भारतामध्ये जे काही वेगवगेळ्या गायकांबद्दल विचार करतो. तर त्याच्यामध्ये अजरामर नाव म्हणजे मोहम्मद रफी यांचं घेतलं जातं. ते फार कमी वयात आपल्यातून निघून गेले आहेत. पण या छोटयाशा त्यांच्या आयुष्यामध्ये रफी साहेबांनीसात हजारांपेक्षा जास्त गाणे त्यांनी गायले आहेत.

त्यांची जन्मभूमीजरी पंजाब असली तरी, त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आणि मुंबई राहिलेली असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. आजही रफींनी फॉलो करणारा आणि त्यांना मनाणार वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या आणि प्रथितयश अशा व्यक्तीमत्त्वाचं जन्मशब्दादी वर्ष येत आहे. नक्कीच त्यांच्या कार्याची दखल घेऊन कार्यक्रम शासनातर्फे साजरा केला जाईल तशा सूचना सांस्कृतिक विभागाला दिल्या जातील अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

कोण आहेत मोहम्मद रफी…?

महोम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आवाजाच्या जोरावर स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली होती. रफीसाहेबांचे टोपणनाव फीको असे होते. त्यांना गाण्याची प्रेरणा एका फकिराकडून मिळाली होती. रफी जेव्हा ७ वर्षांचे होते तेव्हा भावाच्या सलूनमध्ये त्याला मदत करण्यासाठी थांबायचे. त्यावेळी तेथे एक फकीर यायचा. रफी त्या फिकराची नक्कल करत संपूर्ण शहरात त्याच्या मागे फिरत असायचा. रफीसाहेब हे आपल्यात नसले तरी, त्यांच्या असंख्य आठवणी आपल्यामध्ये आहेत. ज्यावेळी त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube