मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळाली नसून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिलं आहे. मध्यांतरी आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण देशमुख यांनी प्रवेश केला नाही. मात्र, आज नागपूरमध्ये आज आशिष देशमुख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आशिष देशमुखांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, चर्चांना उधाण
आशिष देशमुख म्हणाले, मी आमदार असल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे यांचे आणि आमच्यात घरोब्याचे संबंध आहेत. त्यांनी मला आज नाश्त्यासाठी बोलावले आहे. नोटीशीवर उत्तर दिल्यानंतर काँग्रेसने माझ्यावर कारवाई केलेली नाही आणि करणार नसल्याचाही विश्वास यावेळी देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसेच मला भाजपकडून कोणतीही ऑफर नसून फक्त नाश्ता करण्यासाठीच बोलवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Video : मविआ फुटणार! पवारांच्या विधानाला महत्त्व अन् गांभीर्य; CM शिंदेंचं सूचक विधान
आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली असून या भेटीत दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे. तसेच मी 2009 सालीच आमदार असताना भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी नवख्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवत चांगली लढत दिली होती. काँग्रेस नेत्यांचा माझ्यावर विश्वास असून निलंबनाच्या नोटीशीनंतर काँग्रेस माझ्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राजा सुजात, मी तुमचाच माणूस…; सुजात आंबेडकर आणि निखिल वागळे वादावर पडदा?
राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरमधील काटोल आणि हिंगणा मतदारसंघाची जागा काँग्रेससाठी सोडणार असेल तर मी या मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार असल्याचंही आशिष देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची ऑफर आणि भाजपकडून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रकांतदादांचा अजब सल्ला ! कार्यकर्त्यांना म्हणाले, आता पैसे खर्च करा..
दरम्यान, आशिष देशमुख यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर त्यांना नोटीस बजावत उत्तर मागितलं होतं. त्यावर आशिष देशमुखांनी उत्तर दिलंय.
काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईनंतर आशिष देशमुख इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याचा सूर धरण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रवेश केलेला नाही. मात्र, आशिष देशमुख आज बावनकुळेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर आशिष देशमुखांनी स्पष्टीकरण दिलंय.