राजा सुजात, मी तुमचाच माणूस…; सुजात आंबेडकर आणि निखिल वागळे वादावर पडदा?
Sujat Ambedkar wishes Nikhil Wagle on his birthday: गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. दरम्यान, आता हा वाद काहीसा निवळल्याचं दिसतं. कारण, सुजात आंबडेकर यांनी नमती भूमिका घेत निखिल वागळेंना सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सुजात यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली की, निखिल वागळे सर, तुम्हाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. प्रस्थापित मीडियाला पर्याय उभे करण्याच्या संघर्षात तुम्ही एक महत्वाचे शिलेदार आहात आणि राहाल. तुमच्या संघर्षाबद्दल आदरच राहील. वंचितांचे स्वतंत्र राजकारण, प्रस्थापित पक्षांच्या पंखाली न राहता, पर्याय म्हणून उभे करण्याचा आमचा संघर्ष चालूच राहील, अशा आशयाची पोस्ट लिहिली.
त्यांनतर निखिल वागळें देखील फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, राजा सुजात, मी तुमचाच माणूस आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
निखिल वागळेंकडून वंचितवर भाजपची बी टीम असल्याचे अनेकदा आरोप केले. त्यामुळं वंचित आणि निखिल वागळे यांच्यातून विस्तवही जात नाही. वागळेंवर अनेकदा जातीवादी ब्राम्हण अशी टीका झाला. याबाबत वागळे म्हणतात, गेल्या 40 वर्ष चळवळीबरोबर घालवल्यावर, प्रत्यक्ष जात, धर्म सोडल्यावर केवळ जन्मावरुन ब्राम्हण म्हणून आरोप होणार असेल तर वेदना होतात. पण आता राग येत नाही. कीव येते हा आरोप करणाऱ्यांची. कारण आरोप करणारे अजून जातीच्या डबक्यातच आहेत. वंचित बहुजन आघाडी हा एक जातीयवादी पक्ष आहे हे आज सिद्ध झालं, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांनी सुजात आंबेडकर यांनी थिल्लर असं संबोधलं होतं.
लोकं नशा करुन सकाळीच कुस्ती खेळताहेत, फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला…
निखिल वागळे आणि सुजात आंबेडकर यांच्यातील वादानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वागळेंना मोठे ट्रोल केले होते. या वादानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धोका असल्याची तक्रार वागळेंनी केली होती. आपल्यलाा मारायच्या धमक्या येत आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, आता सुजात आंबेडकर यांनी निखिल वागळेंना शुभेच्छा देत वागळेंविषयी आदर व्यक्त केला. तर वागळेंनीही सुजात यांच्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिल्या. त्यामुळं आता या वादावर पडदा पडलेला दिसतो आहे.