अहो आश्चर्य! बाळाच्या पोटात बाळ, बुलढाण्यातील दुर्मिळ घटनेची तुफान चर्चा

बुलढाण्यात महिलेच्या पोटात जे बाळ होतं त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं उघडकीस आलं.

Buldhana

Buldhana

Buldhana News : निसर्गाची किमया कधी काय असेल याचा अंदाज माणसाला बांधता येत नाही. आताही निसर्गाच्या अशाच एका अविष्काराची थक्क करणारी घटना बुलढाण्यात घडली आहे. आता ही घटनाच अशी आहे की ज्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. घटना ऐकताच प्रत्येकाच्याच डोक्यात पहिला प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे? पण म्हणतात ना निसर्ग कधी काय करेल सांगता येत नाही. बुलढाण्यात एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं उघडकीस आलं. वैद्यकिय क्षेत्रालाही कोड्यात टाकणारा हा अति दुर्मिळ प्रकार समोर आला. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही अनोखी घटना घडली.

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, अजित पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना

या महिलेची सोनोग्राफी केली असता त्यांना वेगळेच काहीतरी आढळून आले. त्यांना तपासणीत महिलेच्या गर्भातील बाळच नाही तर त्या बाळाच्या पोटातही बाळ दिसून आले. त्यामुळे रुग्णालयातील डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी दोन ते तीन वेळा तपासणी केली. यात बाळाच्या पोटात बाळ असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉक्टरांनी वरिष्ठ आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. या गर्भवती महिलेचे नऊ महिने पूर्ण झाले आहेत. त्यातच अशी जटील परिस्थिती निर्माण झाल्याने तिच्या प्रसुतीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढण्याचा हा प्रकार अतिशय दु्र्मिळ आहे. देशात आतापर्यंत अशा दहा ते पंधरा आणि जगभरात दोनशे घटना घडल्या आहेत. पहिली घटना 1983 मध्ये घडली होती. वैद्यकिय भाषेत अशा प्रकारच्या गर्भधारणेला फीटस इन फीटू असे म्हटले जाते. बाळाच्या पोटात बाळ असणे ही अति दुर्मिळ प्रकारातील घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटात दुसरे अर्भक वाढत असते. साधारण पाच लाख गर्भवती महिलांत अशी एखादी केस दिसून येते अशी माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत महिलेच्या पोटातील बाळाला कोणताही धोका नाही. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्यानुसार पुढील निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. दरम्यान, महिलेची प्रसुती व्यवस्थित व्हावी यासाठी तिला अन्य जिल्ह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जीबीएस संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात, परंतु पाण्याची तपासणी न करताच माघारी

Exit mobile version