Anil Deshmukh won’s elections : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस म्हणजेच चौदा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. गाड्यांवर फुलांची सजावट करण्यात आली होती. सात ते आठ किलोमिटर रॅली काढण्यात आली होती.
त्यानंतर अनिल देशमुख राज्याच्या मुख्य राजकारणात चर्चेत देखील नव्हते. आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी आपलं वर्चस्व दाखवून द्यायला सुरूवात केली. त्यांनी जोमाने काला सुरूवात केली आहे. याची सुरूवात झाली ती चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर देशमुखांनी मिळवलेल्या मोठ्या विजयाने. हा विजय त्यांना नरखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळाला आहे.
Jayant Patil : अमेरिकेत शिकून आलेला तरुण पोरगा ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; आता ED च्या कचाट्यात
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद यश मिळवलं आहे. तब्बल 46 वर्षांनंतर सहकार क्षेत्रातील निवडणुकीतील मोठा विजय मानला जात आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्या पॅनलचे 11 पैकी 8 जागांवर दणदणीत विजयी मिळवला. तर हा विजय परिश्रम घेणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे झाला आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.