Bhandara Crime News: प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा खबळबनक प्रकार भंडाऱ्यात घडला असून फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध (Sub Divisional Police Officer of Bhandara) विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“मंत्रिपदात रस नाही, मी राज्यात पक्षविस्तार करणार”; श्रीकांत शिदेंनी स्पष्टच सांगितलं
तक्रारीसाठी गेल्यावर उपविभागित अधिकारी डॉ. अशोक बागुल याने आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बागुल याच्यावर भादवी 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूरात शिक्षण घेत असतांना तिची उमेशरत्न नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेशी शारीरीक सबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, पीडितीने प्रियकराकडे लग्न करण्याचा हट्ट धरला तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळं खचेल्या तरुणींने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
‘आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं पण …’ फडणवीसांनी सांगितले पराभवाचे गणित
पीडितेने प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे गेली. फिर्यादी तरुणीने सर्व हकिकत सांगितल्यावर आरोपी बागुल याने तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली.
यावेळी बागुलने तू सुंदर आहेस. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला मदत करेन. पण माझी एक अट आहे. तू आणि मी क्लोज फ्रेंड राहू. तुझे आयुष्य बदलेने. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेटवर जाऊ. तू मला त्यासाठी मतद कर मी तुला कधीच एकटे सोडणार नाहीस. माझ्या वयावर जाऊ नको, मी तुला आयुष्यभर सांगाळेन. हे तू कुणाला सांगू नको, असं म्हणत बागुल याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
दरम्यान, बागुल याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तापस मपोउपनि. कुंभरे करत आहेत.