One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! 12 दिवसांपासून होता फरार

One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! 12 दिवसांपासून होता फरार

One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी गणेश वाघ (Ganseh Wagh)अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक विभागाच्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (Nashik ACB)पथकाला गणेश वाघला अटक करण्यात यश मिळालं आहे. नाशिकच्या पथकानं लाचखोर अधिकारी गणेश वाघला आज सकाळी (दि.14) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Ahmednagar District and Sessions Courts)हजर करण्यात आले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police custody)सुनावण्यात आली आहे.

पुण्याचं ‘गुपित’ सांगण्याच्या रामदासभाईंच्या इशाऱ्याने कीर्तिकर घायाळ : म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’

मुंबईकडून (Mumbai)धुळ्याकडे (Dhule)जात असताना पथकाने त्याला अटक केली. लाचखोर अधिकारी गणेश वाघला अटक करण्यात यश आल्याने आता अनेक गोष्टींचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

एक कोटीची लाच घेतल्याचे प्रकरण राज्यभर चर्चेत होते. त्यामधील एक अधिकारी 12 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आज अखेर त्या अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

शासकीय ठेकेदाराचे अडीच कोटी रुपयांच्या बिलांच्या मंजुरीच्या स्वाक्षरीसाठी अधिकारी गणेश वाघने एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC)नगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथील शासकीय ठेकेदाराने काम केलं होतं. गणेश वाघ हा नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होता. त्यावेळी ठेकेदाराने पाईपलाईनचं काम केलं होतं.

त्या कामाच्या बिलावर गणेश वाघ याची स्वाक्षरी गरजेची होती. परंतु गणेश वाघ याची धुळे येथे बढती मिळून बदली झाली. ठेकेदाराला कामाच्या उर्वरित बिल मंजुरीसाठी गणेश वाघची बिलावर स्वाक्षरी पाहिजे होती. यासाठी गणेशने 1 कोटी रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले.

नाशिकच्या एसीबीच्या पथकाने अमित गायकवाडला लाचेची रक्कम स्विकारताना अटक केली होती. मात्र या सर्व प्रकरणामागे गणेश वाघ असल्याचं एसीबीच्या तपासात समोर आलं. त्यानंतर लाचखोर अधिकारी वाघ फरार झाला. तब्बल 12 दिवसांपासून गणेश वाघ पोलिसांना गुंगारा देत होता. आज अखेर पोलिसांच्या पथकाला त्याला पकडण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता आणखी चौकशीमधून काही गोष्टींवरुन पडदा उठणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube