आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज…; खासदार अनिल बोंडेंचं खळबळजनक विधान

सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.

Anil Bonde

Anil Bonde

Anil Bonde : कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणार भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी आज पुन्हा एकदा खळबजनक वक्तव्य केलं. सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य बोंडे यांनी केलं. ते आज अमरावतीमध्ये (Amravati) बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, लागू होणार सुधारित पेन्शन योजना 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ समस्त हिंदू समाजाच्या वतीने अमरावती येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटनेचे कार्यकर्ते हजारोच्या सहभागी झाले होते. या मोर्चात भाजपचे खासदार अनिल बोंडे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने वादग्रस्त विधान केलं. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना बंदुका बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन जाईन, असे नानकराम नेभनानी म्हणाले. ते पुढे म्हणाले, त्यांनी आत्मरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर ठेवावी. दोन-चार लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको, असं नेभनानी म्हणाले.

फडणवीसांनी हात वर केलेत, महायुतीमध्ये महाभारत चाललंय, पुढच्या महिन्यात…; पटोलेंचा मोठा दावा 

नेभनानी यांच्या वक्तव्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले बोंडे म्हणाले, आत्ताच नेभनानी म्हणत होते प्रत्येकाकडे बंदूक देतो. इतरांना द्यायची की नाही हे मला माहीत नाही. पण आधी मला द्या. कारण मला आता जास्त गगरज आहे, असं खळबळजनक विधान बोंडे यांनी केले. त्यांच्या या धक्कादायक वक्तव्यामळं एकच खळबळ उडाली.

काँग्रेसवर टीका करताना बोंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर सारख्या योजना आणल्या जेणेकरून प्रत्येकाला लढता येईल. मात्र विरोधक त्यालाही कांचाही याला विरोध आहे. कारण त्यांना भारताचे बांगलादेश बनवायचे आहे, अशी टीका बोंडेंनी केली.

ते म्हणाले, मंदिरं कोणी तोडली, बुद्धांच्या मूर्ती कोणी तोडल्या तर त्या बादशाहांनी. असं कधी ऐकलं का की, कुठल्या हिंदूंनी कुठल्या मंदिर किंवा मशिदीवर हल्ला केला? जिथे कुठं मंदिर असेल तिथे सर्वांनी सात वाजता आरतीसाठी जमावं. प्रवासात असाल तर जवळच्या मंदिरात गोळा व्हावं, असं आवाहन बोंडे यांनी केले.

दरम्यान, बोंडेंनी आधी मला बंदूक द्या, मला जास्त गरज आहे, असं वक्तव्य केल्यानं सत्ताधारी पक्षातीलच लोकांनी कायदा हातात घेण्याची भाषा केल्यानं कायदा व सुव्यवस्थेचे काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Exit mobile version