Download App

चंद्रपूरमध्ये ४० प्रशिक्षणार्थी पोलिसांनी जेवणातून विषबाधा, ९ जणांची प्रकृती चिंताजनक

  • Written By: Last Updated:

Chandrapur trainee police poisoned by food : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना आज (दि. १० मार्च) रोजी जेवणात विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील काही पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर विषबाधा झालेल्या नऊ पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Shirdi Loksabha : लोखंडेंचा पत्ता कट तर घोलपांना संधी? मविआचे उमेदवार कोण? 

मिळालेल्या माहितीनुसार, गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस भरती घेतली होती. या भरतीत उत्तीर्ण झालेल्या सुमारे दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी म्हणून चंद्रपूरला पाठवण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील कॅन्टीनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करतात. आज (रविवार) सकाळच्या शिफ्टमधील सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थींनी कॅन्टीनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थींना त्रास होऊ लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील ९ पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

ठाकरेंना मोठा धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकरांचा शिंदे गटात प्रवेश 

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने या जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. विषबाधा कशातून झाली हे, अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

follow us