Shirdi Loksabha : लोखंडेंचा पत्ता कट तर घोलपांना संधी? मविआचे उमेदवार कोण?

  • Written By: Published:
Shirdi Loksabha : लोखंडेंचा पत्ता कट तर घोलपांना संधी? मविआचे उमेदवार कोण?

Loksabha Election 2024, Shirdi Loksabha Candidates: प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. (Loksabha Election 2024) राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबचे सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) यंदा रंगतदार होणार असे चित्र आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक बदल दिसतील असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्यासाठी यंदाची लोकसभा जड जाण्याची शक्यता आहे. लोखंडे यांच्या विरोधात मतदार संघात नाराजीचे वातावरण आहे, यामुळे याचा फायदा इतर उमेदवारांना मिळू शकतो. राजकीय पक्षांकडून लोकसभेचे अधिकृत उमेदवारांची नावे अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. शिर्डीमधून ठाकरे गटाने देखील जोरदार तयारी केली आहे तर दुसरीकडे काँग्रेस देखील यास्पर्धेत आहे. तसेच रामदास आठवले यांनी देखील शिर्डीसाठी इच्छुकता दर्शवली असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार व कोण खासदार होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी शिर्डीतील राजकीय परिस्थिती काय आहे याबाबत आपण जाणून घेऊ….


‘खंडोजी खोपडेची अवलाद…’; रवींद्र वायकरांचे नाव घेता ठाकरेंचे टीकास्त्र


सदाशिव लोखंडेंवर जनता नाराज
?

शिर्डीला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी गेली दोन टर्म शिवसेनेचे खासदार हे निवडून आले आहेत. सदाशिव लोखंडे हे सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेत असून, आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी तिसरी आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान भाजपमधून राजकारणाची सुरुवात करणारे लोखंडे हे तीनदा आमदार झाले तर दोनदा खासदार झाले आहे. यंदाची त्यांची तिसरी टर्म आहे मात्र मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी असलेली नाराजी त्यांना अडचणीची ठरू शकते. मतदार संघामध्ये फारसा वावर नसल्याने तसेस जनसंपर्क कमी असल्याने जनतेमध्ये लोखंडे यांच्याविषयी कमालीची नाराजी असल्याचे बोलले जाते. यामुळे खासदारकीची हॅट्रिक करण्यापूर्वीच लोखंडे यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल


महायुती कोणाला जागा सोडणार
?

2009 मध्ये रामदास आठवले यांनी शिर्डीमधून निवडणूक लढवली यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे हे होते. वाकचौरे यांनी मोठ्या मताधिक्याने आठवले यांना पराभूत केले. 2014 मध्ये वाकचौरे यांनी काँग्रेसकडून तिकीट घेतले. यामुळे शिवसेनेने बबनराव घोलप यांना तिकीट दिले मात्र त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांची लॉटरी लागली व मोदी लाटेत ते निवडून आले. 2019 मध्ये लोखंडे पुन्हा एकदा निवडून आले. मात्र मतदार संघातील नाराजीमुळे लोखंडे यांना तिकीट मिळणार का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली तर शिंदे गटाकडून बबनराव घोलप हे देखील उमेदवार असू शकतात अशी चर्चा रंगते आहे. मात्र भाजप देखील यंदा या जागेसाठी आग्रही आहे. महायुतीकडून जागा आपल्याला सोडण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले करत आहेत.


महाविकास आघाडीत जागेवरून तेढ

शिर्डीसाठी महाविकास आघाडीकडून देखील तयारी सुरु आहे. ठाकरे गटाकडून याजागेसाठी दावा केला जातो आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार मानले जात आहे. मात्र वाकचौरेंना विरोध होत असल्याने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील लोकसभेसाठी तयारीत आहे. तसेच दलबदलूंपेक्षा एकनिष्ठांसाठी हि जागा सोडण्यात यावी अशी मागणी करत काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते यांनी देखील लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. कॉंग्रेसला हि जागा सुटल्यास आपण उमेदवारी करू असे रुपवते यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसची मोठी ताकद शिर्डीमध्ये आहे.

शिर्डीत महायुतीचे पारडे जड

शिर्डी मतदार संघामध्ये विधानसभा आमदारांचे तुल्यबळ विचारात घेतले असता राष्ट्रवादीचे दोन आमदार, काँग्रेसचे दोन, भाजपचे एक व अपक्ष एक असे सहा आमदार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता महायुतीने आतापासूनच याठिकाणी पक्ष संघटन सुरु ठेवले आहे. दरम्यान शिर्डीमध्ये विखे ठरवतील तसेच गणित जुळतात यामुळे महायुतीच्या उमेदवारासाठी विखे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार हे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील असतील यामुळे सध्यातरी महायुतीचे पारडे या ठिकाणी जड असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. मात्र शिवसेनेतील फुटींनंतर ठाकरेंना मिळालेली सहानुभूती महायुतील जड जाऊ शकते असे देखील बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube