नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळसह बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
https://letsupp.com/mumbai/irshalwadi-western-ghat-landslide-story-71230.html
मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि यवतमाळ, नांदेडसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काल पावसाने जोर चांगलाच जोर धरला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नूकसान झालं असून शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव पाठवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…
मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरसदृश्य भागातून अनेक नागरिकांचं स्थलांतरही करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अतिवृष्टीबाधित क्षेत्रातील आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला. त्यानंतर पुरामुळे नूकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचेही पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
शिंदे CM कसे झाले? भाजपश्रेष्ठींना त्यांची शिफारस कुणी केली? फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा गावात पुरामुळे अडकलेल्या सुमारे 110 जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. यवतमाळमधील अनेक भागात पुराचे पाणी साचले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटरगाव येथे शनिवारी सुमारे 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भाच्या इतर भागात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सदरील ठिकाणी नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.