Download App

‘एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी…’; वसंत पुरकेंची भाजपवर टीका

  • Written By: Last Updated:

गडचिरोली : भारत हा एक समृध्द लोकशाही असलेला देश आहे. मात्र, आता भाजप सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते आणि माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके (Vasant Purke) यांनीही भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असून देशातील लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून खेचलं पाहीजे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

गडचिलोरीमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून जनसंवाद यात्रा सुरू आहे. या जनसंवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी पुरके गडचिरोलीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपल्या समृद्ध लोकशाहीमुळे एक तडीपार देशाचा गृहमंत्री होऊ शकतो, तर माझ्यासारखा आदिवासी शिक्षक राज्यात मंत्री होऊ शकतो, हीच आपल्या देशातील सुंदरता आहे. ही सुंदरता आपल्याला टिकवायची असेल तर भाजपसारख्या पक्षाला सत्तेवरून हटवले पाहिजे, असं ते म्हणाले.

पुरके म्हणाले की, पंतप्रधान मोदींसह सर्व राज्यकर्ते मणिपूरसारख्या घटनांवर मौन बाळगून आहेत. देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडविलल्या जात आहेत. बेरोजगारी, आत्महत्या खूप वाढल्या आहेत. मात्र त्यावर बोलण्याऐवजी सत्ताधारी केवळं शहरांची, रस्त्यांची आणि आता तर देशाचं नाव बदलण्यात व्यस्त आहेत. काही बिनडोक लोक वायफळ बोलून समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यभर जाणते राजे म्हणून फिरले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले का? विखेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

देशात केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारभारावरूनही त्यांनी सरकारव टीका केली. संस्थांचा गैरवापर होत असून विरोधकांच्या पाठीमागे ‘ईडी’ लावण्यात येत आहे. पत्रकारांना तुरुंगात डांबून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे. त्यामुळं देशात सत्तापरिवर्तन आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहे, असं पुरके म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार नवदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव किरसान, विश्वजित कोवासे आदी नेते उपस्थित होते.

Tags

follow us