राज्यभर जाणते राजे म्हणून फिरले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले का? विखेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

राज्यभर जाणते राजे म्हणून फिरले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले का? विखेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.शरद पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण एवढे वर्ष सत्तेत राहिले आहेत, जाणते राजे म्हणून राज्यभर फिरत राहिलात पण मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांनी काही प्रयत्न केल्याचे आम्हाला कधी ऐकायला मिळाले नसल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

पुण्याला राज ठाकरेंनी गंभीरतेने घेतलयं…. भाजपची कोंडी करण्यासाठी थेट पुत्रालाच पाठवलयं…

मंत्री विखे म्हणाले की, शरद पवारांनी सांगावे की, आपण मराठा आरक्षणासाठी प्रयत्न कधी केले? त्यांनी मुख्यमंत्री असताना कधी प्रयत्न केले? केंद्रात मंत्री असताना प्रयत्न कधी केले? महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून कधी प्रयत्न केले? हे त्यांनी सांगावे. लोकांनाही ते कळू द्या असा टोलाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

Dhangar Reservation : धनगर समाज आरक्षणासाठी उपोषणाला; रोहित पवारांनी घेतली आंदोलकांची भेट

मंत्री विखे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुनबीचे दाखले देण्याची मागणी जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांडे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या पहिल्या मागणीत सुरुवातीला कुनबीचे दाखले देण्याची मागणी होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय धोरण जाहीर केलं आहे. हैदराबादला जावून लोकांचे पुरावे दाखले गोळा करत आहोत, मात्र ज्यांच्याकडे हे दाखले, पुरावे आहेत. त्यांना कुनबीचे दाखले देण्यासाठी सरकारने पाऊल उचललं आहे.

हीच मूळ मागणी होती, जरांगे पाटील यांची. ओबीसींच्या आरक्षणालाही धक्का लागणार आहे. पहिल्यापासूनच ही भूमिका आहे. काही नवीन भूमिका नाही. त्यामुळे कुनबीचे दाखले द्यायला सुरुवात केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी जी आहे, ती आपण पूर्ण केली असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण भाजपच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं ते महाविकास आघाडीच्या सरकारने घालवलं. आणि तेच लोकं त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी भाषणं करत आहेत. भाजप सरकारची भूमिका त्यावेळी देखील अत्यंत स्पष्ट होती. आणि आजही आम्ही मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत, अशी भूमिका आमची आहे, असेही यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट आहे. दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही समाजविनाशक मंडळी घुसलेली आहे. ते हे मराठा आंदोलन वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजबांधवांना माझी विनंती आहे की, सरकारची भूमिका ही प्रामाणिक आहे.

आज जालन्यामध्ये जाऊन उद्धव ठाकरे, शरद पवार जाऊन बोलतात. खरं पाहिलं तर मराठा आरक्षणावर बोलण्याचा यांना नैतिक अधिकार नसल्याचे यावेळी राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य असलेले मुख्यमंत्री होते. शरद पवार होते, आज तुमची लक्तरं टांगली जातील वेशीवर, त्यामुळे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाजबांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी हे ओळखलं पाहिजे, असेही मंत्री विखे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube