Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात…
केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे शिवार फेरीच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला. तर मुंडेंच्या या तत्परतेने सबंध देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले आहे. धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदन कर्त्या शेतकऱ्यांसह असंख्य शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
राऊतांच्या दाव्यानुसार बावनकुळे ज्या ‘मकाऊ veneshine’ मध्ये गेले तोच आहे जगातील सर्वात मोठा कॅसिनो!
त्यामुळे आता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून, या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
“राऊतांचं ट्विट, बावनकुळेंचा फोटो” : राजकीय वादात जाणून घ्या, मकाऊमधील कॅसिनोंचा इतिहास
दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तत्परता दाखवली म्हणून राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मुंडे यांचे आभार मानले आहेत. त्यात ज्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले होते. त्यांनी पत्र लिहून मुंडे यांचे आभार मानले आहेत.