Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण्यांची भाषा ही खालच्या पातळीवर घसरल्याचं दिसतं. राजकीय टीका टिप्पणी करतांना नेते एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली जाते. त्याचाच पुर्नउच्चार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. राज्यात राजकीय प्रदुषण वाढले असून राजकारणातील सगळेच व्यक्ती असुर नसतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्याकंडे त्यांचा रोख होता, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
AUS vs IND : ‘यंग ब्रिगेड’ने ऑस्ट्रेलियाला लोळवले ! भारताने टी-20 मालिका जिंकली
नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय चिमटे काढले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी राजकीय प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. मी आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी आमचे सुर एकच आहेत. नागपूरचे सुपुत्र नितीन गडकरी आणि फडणवीस हे दोघेही चांगले कलाकार आहेत. राजकारणात सारेच असुर नसतात, असं शिंदे म्हणाले.
‘मला ऑफर होती, पण..,’; अजितदादांच्या दाव्यावर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
यावेळी बोलतांना शिंदे यांनी गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, आज गडकरी देशभरात जे काही रस्ते, पुल यांच जाळं तयार करत आहेत. ते आवश्यकच आहे. देशाच्या विकासाठी त्यांचं फार मोठ योगदान आहे. विकासपुरूष म्हणून त्यांची ख्याती आहे. गडकरी हे उत्तम गायकही आहेत. त्याचं श्रीवल्ली हे गाणं फार व्हायरल झालं. राजकारणात सारेच असुर नसतात. गडकरी साहेबांसारखे काही सुरेल माणसंही असतात. गडकरी यांच्यासारखे नेते हलकं-फुलकं बोलून राजकारणातील प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करतात, असं शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, गडकरी साहेब, दर्दी खवय्ये असले तरी त्यांचे बोलणं हे सावजीच्या रश्य़ासारखं झणझणीत असतं. त्यांचा आग्रह हा आमच्यासाठी प्रेमाचा आदेश असतो. केवळ मेट्रो, रस्ते, पुल, पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष न देता राज्याची परंपरा आणि संस्कृती जपण्याचीही गरज आहे. त्यासाठी स्थानिक कलाकारांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.