‘मला ऑफर होती, पण..,’; अजितदादांच्या दाव्यावर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

‘मला ऑफर होती, पण..,’; अजितदादांच्या दाव्यावर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

Anil Deshmukh On Ajit Pawar : मला ऑफर होती, पण गेलो नाही नसल्याचं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil deshmukh) यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या विचार मंथन शिबिरातून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजपने सभागृहात आरोप केल्यानेच भाजपने त्यांना मंत्रिपद नाकारल्याचा दावा अजित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावर आता अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा…रोहित पवारांचे अजितदादांना सडेतोड प्रत्युत्तर!

अनिल देशमुख म्हणाले, तुम्हाला जे खाते पाहिजे ते आम्ही देतो पण तुम्ही आमच्या सोबत या अशी ऑफर मला होती. परंतु ८३ वर्षाच्या बापाला सोडून मी कधीच येणार नाही असे मी ठामपणे सांगितले होते. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित होतो. पण त्या बैठकीत यावर चर्चा होतांना मी नेहमीच सांगत होतो की, शरद पवारांना या वयात आपण असे चुकीचे निर्णय घेऊन त्रास देवून नका, असं आपण सांगितल्याचं देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.

Uddhav Thackeray : कृषिमंत्र्यांनी कुठल्या तरी एका घरात बसून कामं करावीत, उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंना डिवचलं…

ज्या दिवशी हा शपथविधी होता, त्या दिवशी मी पुण्याला होतो. मला अनेक फोन येत होते, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तुम्ही या. पण ज्या पक्षाने खोटा आरोपाखाली मला त्रास दिला त्या भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत त्यांना हे सांगण्यासाठी 6 महिने का लागले? असा प्रश्न सुध्दा अनिल देशमुखांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार यांनी जे विधान केलं आहे ते चुकीचं असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?
अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही. मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असं अजित पवारांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube