Download App

CM Eknath shinde आजारी असल्याचे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपचा डाव

Image Credit: Vijay Wadettiwar

Vijay Vadettiwar on CM Eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या तब्येतीचं कारण देऊन मुख्यमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar)यांना बसवण्याचा डाव भाजपचा असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केला आहे. ते गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते सांगतात की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब असल्याचे सांगतात. आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याचे खंडन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याचे सांगितले जाते.

थोरातांना उमेदवारी द्या, पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उडवू : निरीक्षकांसमोरच कार्यकर्ते आक्रमक

त्यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायम आरोग्याच्या दृष्टीकोनातून अॅडमिट करायचे आणि राजीनामा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

यातून स्पष्टपणे दिसत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पावसाळी अधिवेशनातील सहभाग देखील अत्यंत कमी होता. विधानपरिषदेमध्ये मुख्यमंत्री केवळ दोनवेळा गेले आणि विधानपरिषदेमध्ये फक्त चारवेळा गेल्याचे पाहायला मिळाले.

ही उपस्थिती, तब्येतीची काळजी घेणे, सार्वजनिक कार्यक्रमांना टाळणे, आराम करण्यासाठी बाहेर जाणे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला असते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा खुलासा होणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जी माहिती मिळते त्यावरुन असे वाटते की, त्यांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्या पदापासून दूर करण्याचा प्रयत्न दिल्लीतील त्यांच्या हायकमांडने सुरु केला असावा अशी भावना सर्वदूर झाल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Tags

follow us

वेब स्टोरीज