Download App

अमरावतीचा तिढा! शिंदे गटाचा दावा, रवी राणांचाही NDA नेत्यांना सज्जड दम

Amravati Lok Sabha Constituency : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढू असा इशारा शिंदे गटाने दिला आहे. तर दुसरीकडे लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ त्यावर कुणीही डाऊट घेऊ नये असे सूचक वक्तव्य खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले.

तर त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांनी एनडीएच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनाच दम भरला आहे. जे लोकं एनडीएच्या घटक पक्षांचं इमानदारीने काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायला लावू असा दमच त्यांनी भरला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून स्थानिक पातळीवर शिवसेना (शिंदे गट), भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.

Loksabha Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे प्रशासन अलर्ट मोडवर ! टोल फ्री क्रमांकही जाहीर

आगामी काळात एनडीचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील. त्यांचा प्रचारही करतील. काही कार्यकर्त्यांनी जर पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार केला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करील, असा दम रवी राणा यांनी दिला.

खासदार नवनीत राणा यांनाच पुन्हा तिकीट मिळेल असे सांगितले जात आहे. परंतु, त्यांच्या विरोधात महायुतीतील नेत्यांनी आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. अमरावतीची जागा शिंदे गटाची आहे. तेव्हा या जागेवरून आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ येथून लढतील. जर नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिली तर स्वचः अपक्ष लढणार असा निर्धार अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून अमरावतीत तिढा निर्माण झाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात अभिजीत अडसूळ राणांचे राजकीय विरोधक आहेत. 2019 च्या निवडणुकीत अभिजीत अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा विजयी झाल्या होत्या.

नवनीत राणांच्या वक्तव्याने ट्विस्टट

मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगितले जात आहे. यासाी त्यांनी भाजपात प्रवेश करावा असे भाजप नेते सांगत आहेत. परंतु, राणा दाम्पत्याने अद्याप भाजपात प्रवेश केलेला नाही. या घडामोडीत नवनीत राणा यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते याबाबत कुणीही डाऊट घेऊ नये. भाजप प्रवेशाबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील, असे राणा म्हणाल्या.

Navneet Rana : ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या अन् दुसऱ्याचं काम केलं 

follow us