Lok Sabha Election : ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का ही भीती वाटते. परवा मी तुम्हाला म्हटलं की मला या भीतीतून मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं.’ हे शब्द आहेत राज्य सरकारचे वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील मुनगंटीवार यांची उमेदवारी हे यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातआहे.
मोठी बातमी : लोकसभा तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
आगामी लोकसभा निवडणुकीत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. भाजप नेतृत्वाने याबाबत निर्णय घेतल्याची माहिती आहे. परंतु, या घडामोडींमुळे मुनगंटीवार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छाच दिसत आहे. माझं तिकीट कापलं जावं अशी वक्तव्ये त्यांच्याकडून येत आहेत.
कालही त्यांनी असेच वक्तव्य केले होते. आम्ही राज्यात सध्या 25 जागांवर आहोत. त्याचं सादरीकरण झालं. यामध्ये काही वाढ झाल्यास त्याही जागा लढवू. चंद्रपूरसाठी पक्षाने माझं नाव सुचवलं आहे. मात्र माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी आग्रही आहे, असे मुनगंटीवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आज तर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विनंती केली आहे.
लेट्सअप विश्लेषण : एकनाथ शिंदेंची कोंडी रामदास कदमांच्या मुखातून बाहेर!
‘या’ उमेदवारांचं तिकीट फायनल?
दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत भाजप बोर्डाच बैठक झाली. या बैठकीत काही आठ उमेदवारांची तिकीटे फायनल करण्यात आली. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, जालनामधून रावसाहेब दानवे, चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरीसाठी भारती पवार आणि बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहिण प्रितम मुंडे या खासदार आहेत. परंतु, या मतदारसंघात आता पंकजा मुंडेंना तिकीट देण्याची चर्चा भारतीय जनता पार्टीत सुरू आहे. जर पंकजा मुंडेंनाच उमेदवारी मिळाली तर पुढे काय राजकीय घडामोडी घडतात, पंकजा मुंडे बहिणीच्या जागी तिकीट स्वीकारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.