लेट्सअप विश्लेषण : एकनाथ शिंदेंची कोंडी रामदास कदमांच्या मुखातून बाहेर!

  • Written By: Published:
लेट्सअप विश्लेषण : एकनाथ शिंदेंची कोंडी रामदास कदमांच्या मुखातून बाहेर!

Ramdas Kadam Attack On BJP Over Seat Sharing : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे सध्या भाजपवर प्रचंड चिडलेले आहेत. आमचा केसाने गळा कापू नका, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. आक्रमक आणि लढवय्ये असलेले कदम यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या भावना दिसून येतात. भाजपवर चिडण्याचे त्यांचे कारण दापोली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणापुरते मर्यादित नाही. कदम यांचे पुत्र योगेश कदम (MLA Yogesh Kadam) हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचेच कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपने केले. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रमासाठी आले होते. बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. त्यातून ही ठिणगी पेटली. भाजपला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असे योगेश कदम यांनीही सांगून टाकले.

Letsupp Special : फडणवीसांपासून शेळकेंपर्यंत… पवार मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांचा घाम काढतात!

याआधी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील वादावरूनदेखील कदम यांनी भाजपला लक्ष्य केले होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. आम्हीच तेथे लढविणार, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे या मतदारसंघातून तयारीला लागले आहेत. भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे हवा आहे. नारायण राणे यांना तेथून उमेदवारी देण्याचे भाजपचे नियोजन आहे. यास कदम यांनी विरोध केला. पण वादाचा मूळ विषय रत्नागिरी मतदारसंघा हा नाही. लोकसभेच्या जागावाटपात एकनाथ शिंदे यांची कोंडी होत आहे. त्यातून शिवसेनेत मोठी नाराजी आहे. भाजपने माझे ते माझे आणि तुझे ते पण माझे, अशी भूमिका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत घेतली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या जागावाटपच्या बैठकीनंतर रामदास कदम यांनी अशी तोफ डागणे याला वेगळे महत्व आहे. शिंदे यांच्या मनातील खदखद ते व्यक्त करतायेत, असेच मानले जात आहे. …तर या वादाची नक्की कारणे काय आहेत ते पाहूया. 00

ठाकरे-पवारांचं रौद्र रूप! लोकसभेपूर्वीच ‘दोन जखमी वाघांची’ डरकाळी; अनेकांना धसका

१) एकनाथ शिंदे हे काही ठाकरे नाहीत….

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करताना भाजपचे नेते किती ताणायचे याचा विचार करत. उद्धव ठाकरे हे पण भाजपशी सन्मानाने समझोता करत. पटले नाही तर, भाजपशी दोनदा युती तोडण्याचे धाडस त्यांनी दाखवले. पण एकनाथ शिंदे हे काही ठाकरे नाहीत. भाजपच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री असल्याने भाजप त्यांना गृहित धरत आहे, अशी भावना शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्याचेच पडसाद जागावाटपाच्या बोलण्यांवर पडले आहेत. एकनाथ शिंदे हे कायदेशीरदृष्ट्या शिवसेनेचे प्रमुख ठऱले असले तरी, भाजप मूळच्या शिवसेनेप्रमाणे त्यांना जागा देण्यास तयार नाही.

२) माझे ते माझे पण, तुझे ते देखील माझे

शिंदे यांची ताकद मूळच्या शिवसेनेप्रमाणे नाही, हे भाजपला माहिती आहे. २०१९ च्या निवडणुकीत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपशी युती करून १८ जागा जिंकल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी जागावाटप करताना या १८ जागा गृहित धरून बोलणी करावीत, असा आग्रह होता. मात्र भाजपला तो मान्य नाही. शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १३ जण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. उरलेले पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदारांच्या जागांवर भाजपने हक्क सांगितला आहे. त्यामुळे रत्नागिरी,  मुंबई दक्षिण, धाराशिव, परभणी आणि ठाणे हे पाच मतदारसंघ भाजपला हवे आहेत. त्यातील ठाणे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांंना मिळू शकतो. पण इतर चार मतदारसंघ भाजपला कोणत्याही स्थितीत हवे आहेत.

मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?

३) शिंदेंना आहे त्या जागाही मिळेनात..

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे १३ खासदार आले त्यांचाही जीव भाजपने टांगणीला लावला आहे. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या जागांवरही भाजपचा डोळा आहे. त्यामुळे हे खासदार देखील अस्वस्थ आहेत. भाजपने तेथे आपल्या इच्छुक उमेदवारांना तयारी करण्यासही लावले आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार निवडून येणार नाहीत, अशी भाजपची भूमिका आहे. तर हे मतदारसंघ कोणते? यात हिंगोली, वाशिम, पालघर, नाशिक, रामटेक, बुलढाणा या सहा मतदारसंघांचा समावेश  आहे. त्यामुळे शिंदे यांना साथ देऊनही यातील काही खासदारांना आपले राजकीय करिअर धोक्यात येण्याची भीती वाटत आहे.

४) उमेदवार शिंदेंचा पण चिन्ह कमळाचे

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांना भाजपने दुसरे लाॅलीपाॅप दाखवले आहे. तुम्हाला धनुष्यबाण चिन्हावर निवडून येण्यास भीती वाटत असेल तर, कमळ चिन्ह देण्याची भाजपची तयारी आहे. त्याचाही शिंदे यांच्या डोक्याला ताप आहे. त्यामुळे आपले उमेदवार भाजप पळवत असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. त्यातून भाजप आपली कोंडी करत असल्याचं त्यांना वाटत आहे. महादेव जानकर यांच्या रासपच्या उमेदवाराबाबत भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत असेच केले होते. दौंड विधानसभेची जागा रासपला सोडल्याचे दाखवले पण, तेथील उमेदवार राहुल कुल यांना ऐनवेळी कमळच्या चिन्हावर लढवले. असेच शिंदे यांच्या काही खासदारांबाबत होऊ शकते.

बारामतीत शरद पवार यांच्या पुन्हा करामती….. अजितदादांच्या प्लॅनला असा लावला सुरूंग!

५) एकनाथ शिंदेंना फक्त ४ जागा मिळणार, याची भीती

या साऱ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना लोकसभा निवडणुकीसाठी फक्त चार जागाच राहतील, असे वाटत आहे. त्यामुळे भाजपने याच आकड्याने चर्चेची सुरूवात केली. त्यातून शिंदेंच्या गटात आणखी अस्वस्थता पसरली. शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील, तितक्याच आम्हाला हव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. म्हणजे शिंदे यांना आठ जागा मिळाल्या तर, तेवढ्याच राष्ट्रवादीला पण हव्या आहेत. प्रत्यक्षात भाजपचे नेमके याच्या उलटे करण्याचा प्लॅन आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसला चार जागा मिळणार आहेत. कारण त्यांचे तेवढेच खासदार निवडून आले होते. तितक्याच जागा आम्ही शिवसेनेला देऊ, अशी चर्चेची सुरूवात झाल्याने सेना नेते त्रस्त आहेत. जागावाटप कसे होणार याचे कोणतेच सूत्र भाजप सेनेच्या मनासारखे ठरवून देत नाही. भाजपच्या या रणनीतीला वैतागलेल्या रामदास कदम यांच्या रूपाने मग शिवसेनेने आपल्या भावना व्यक्त केल्या.  भाजपवर दबाव टाकण्याचाच हा प्रकार होता. पण भाजप शिवसेनेच्या दबावाला किती गंभीरपणे घेणार, हाच आता प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज