Download App

उद्धव ठाकरेंना धक्का! तिकीट वाटपानंतर बडनेरात नाराजी उफाळली; प्रिती बंड अपक्ष लढणार

बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.

Uddhav Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल दिवसभरात काँग्रेस पक्षाने (Maharashtra Elections) उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. तिसरी यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ठाकरे गटानेही याद्या जाहीर केल्या आहेत. या उमेदवारी याद्या जाहीर होत असतानाच नाराजी आणि बंडखोरी उफाळून येऊ लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना धक्का (Uddhav Thackeray) देणारी बातमी आहे. या मतदारसंघात सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे.

प्रीती बंड यांनी (Priti Band) अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असून त्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. या मतदारसंघात प्रिती बंड यांना तिकीट मिळेल अशी चर्चा होती. बंड यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र तिकीट वाटपात त्यांना डावलून सुनील खराटे यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. यानंतर मात्र प्रिती बंड नाराज झाल्या आहेत. निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्णय पक्का आहे. त्यामुळे प्रिती बंड आता अपक्ष उमेदवारी करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी उफाळून येत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागं पाळीव कुत्र्यासारखे फिरता; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंत प्रिती बंड यांनी प्रतिक्रिया दिली होती. मला अगोदर निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मी पदयात्रा आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. पण आता पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतलाय त्यावर काय बोलावं मला सुचत नाही. चार दशकांपासून मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहे. आमच्याकडे पैसेही नव्हते तेव्हा सर्व शिवसैनिकांनी पैसे जमा करू आणि निवडणूक लढवू असे ठरले होते. मात्र अचानक काय झालं ते मला कळलं नाही, असे प्रिती बंड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्णय पक्का आहे. त्यामुळे प्रिती बंड आता अपक्ष उमेदवारी करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी उफाळून येत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रिती बंड यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवला तर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार आहेत.

मोठी बातमी! ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म 

follow us